ती बसस्टॅाप समोर ऊभी होती. सोबत एक मैत्रीणपण होती. अाता ती सोबतची कोण मैत्रीण अाहे की नाही, हे मला कस कळल. म्हणजे मी काही तिला जाऊन वैगरे विचारले नाही की " अापण दोघी मैत्रीणी अाहात काय ?" म्हणुन. तेवढी अापली हिम्मत असती तर मालक अाम्ही हे असे काही लिहित-बिहित बसलो नसतो. त्या दोघीही पेरु खात होत्या. अर्घा-अर्घा भाग दोघींकडे. त्यामुळे वाटल की त्या मैत्रीणी असाव्यात. अाता खरच असतील की नाही, हे मला माहित नाही. पण मालक हे तुम्ही सिद्ध वा असिद्ध करु शकत नाही. कारण ही गोष्ट फक्त मी पाहिली, म्हणजे अजुनही लोक होते तिथ, पण मी जे पाहिले तेच बघणारे कोणी नाही. अाणि समजा बघितले तरी तिच्या बद्दल लिहणारे तर नाहीच. अाणि ही माझी गोष्ट त्यामुळे माझ अैका. पण ते सोडा. तर सांगायची गोष्ट म्हणजे ही युवती मैत्रीणी सोबत पेरु खात बसस्टॅाप समोर ऊभी होती.
असेल तरी अठरा एकोणीस वर्षांची. कॅालेाजत जात असेल. पाठीला मागे बॅग होती. बसची वाट पाहतांना काहीतरी टाईमपास म्हणून पेरु घेतला असेल, किंवा भुक लागलेली म्हणुन. अाता हे काही मात्र अापल्याला माहित नाही. दिसायला तशी छानच होती. बऱ्यापैकी गोरी, पण पांढरी फटक नाही. म्हणजे मुबंईकरांच्या भाषेत म्हणायचे झाले तर वाईफ मटेरियल. ती सुंदर असली तरी लक्षात त्यामुळे नाही राहिली. पेरु ती फारच चवीने खात होती. त्यामुळेच ती लक्षात राहिली. शलवार कमीज् घातली होती, इस्त्री, स्टार्च वैगरे केलेली. कपड्याचा रंग वैगरे चांगला होता एकदम गडद हिरवा होता. म्हणजे तिचा कलर सेन्स अापल्याला अावडला.
तशी ती साधारणपणे माझ्याकडेच बघत होती. मला वाटले की मलाच बघते अाहे. असे बरेचदा वाटत, . पण नंतर कळले की ती अापल्या पलिकडे बघते अाहे. रसत्याच्या दुसऱ्या बाजुला बघितले तर, तिथे बघण्याजोग काही नव्हते. म्हणजे पुष्कळ माणसे, बिलडिंग वैगरे होती, पण विषेश असे काही नाही. मग मला फार बर वाटल. म्हणजे ही पण अापल्यासारखी दिसण्याच्या पलिकडे पाहण्याचा प्रयत्न करत होती. का म्हणुन अापण जे दुष्टीक्षेपात येईल तेच बघायचे? खर जग तर त्या पलिकडेच. अंधाचें तर संपुर्ण जगच असे. दुष्टीक्षेपा पलिकडे बघण्याची अापली सवय लहाणपणाची. म्हणजे खराब झालेली पीसीबी, स्पेस स्टेशन म्हणुन बघायला अाणि वापरायला, (खेळात का ना असु देत) दुष्टीक्षेपा पलिकडे बघावेच लागणार. तर म्हणजे अापण लहाणपणापासुनच जिथे लोकांना काही दिसत नाही, अशा ठिकाणी जहाजे, विमान, पानबुड्या, स्पेस स्टेशन, मोटारी, रणगाडे, बंदुका, सैनिक ईत्यादी बघायचो. हे फक्त मी बघण्यापुरत नाही तर ते तसेच खेळण्या पर्यंत घेऊन जायचो. कारण हे असे दुष्टीक्षेपा पलिकडेचे जग म्हणजे अापल्या बापाची नव्हे तर अापलीच जागीर असते. तिथले नियम, पात्र, गोष्टी या सर्व अापणच ठरवतो. ते म्हणजे एक जागेपणे पाहिलेले स्वपनच असत. असो.
कन्या मात्र अारामात चव घेत, पण भल्ले मोठे चावे न घेता पेरु खात होती. खाता-खाता कसला-बिसला विचार सुरु होता. पण डोळ्यांमध्ये चमक होती. मस्ती होती. जवानी होती. त्यामुळे लिझा रेची अाठवण झाली. तिचे डोळे पण असेच. मस्तीने भरलेले. मला अावडायचे अाणि अातापण अावडतात. लिझा म्हणजे माझी पहिली क्रश. नुसरत फतेह अली खानच्या अाफरिन-अाफरिन मध्ये तिला पहिल्यांदा पाहिले. नुसरत अाणि िलझा दोघांचाही अायुष्यासाठी फॅन झालो. त्यामुळे प्रत्येक मुली मध्ये लिझाची काही प्रतिमा िदसते का बघतो. याचाच कदाचित परिणाम असेल. तशे या पोरीचे डोळे मोठेच, पण डोळ्यांच्या भोवती काजळ लावल्याने ते अाणखी अाकर्षक वाटत होते. भेदक वाटत होते. मोहक वाटत होते. जर तिने नजर मिळवली असती, तर ती काही मला झेलता अाली नसती. गुगली वैगरे नाही. क्लीन बोल्डच. कारण कोणाचे रुप चोरुन बघणे ही एक प्रकाराची चोरीच झाली. अाणि अापण या बाबत ईतकेपण निर्ल्लज नाही, की चोरी करुन थेट नजर मिळवावी. एकुणतर म्हणजे पोरींची गोष्ट अाली म्हणजे अापण फाटेच. त्यात सुंदर वा अापल्याला अावडणाऱ्या, अोळखीच्या असल्या म्हणजे मिळवली. पण ही तर अापल्याला पुर्णपणे अज्ञात होती. पुढे कुठ भेटण्याचा काहीच स्कोप नव्हता. तरीही भिती का हे कोणास ठाऊक? फ्रॅाईड म्हणतो की जे लोक नजर चुकवतात ते न्युरोटीक असतात. जेव्हा हे मला कळले होते तेव्हा, एखाद पदवी मिळेल ईतका तर नाही, पण त्यापेक्षा थोडाच कमी अानंद मला झाला. पण मग नंतर कळाले की नवद्द टक्के लोक न्युरोटीक असतात तर थोडी निराशाच झाली. च्याअायला म्हणजे अापली या बाबत काही अायडेंटीटीच नाही. मग अापण जगापेक्षा वेगळे तर ते कसे?
पेरुला मीठ किंवा तिखट-मीठ लाालेले असेल. कारण जे पेरुचे छोटेखानी घास ती खात होती, ते खाता-खाता तिच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी सटलपणे बदलत होते. हे असे भाव फक्त अांबट-गोड खातांनाच येऊ शकतात. हे ती अगदी मन-मोकळेपणाने करत होती. तिला काय माहित माझ्यासारखा कोणी तिच्या या सगळ्या गोष्टी मनातल्या डायरी मध्ये टिपतो अाहे ते. अापणाला कोणी बघत अाहे, हे अापल्याला कळल्यावर अापल बिहेव्हियर बदलत. ते म्हणतात की बघणाऱ्या मुळे लोक कॅानशस होतात. पण हिचे मात्र असे काही नाही. ही तर मनमोकळी. सर्वांच्या देखत, सगळ्यांना दाखवत पेरु खात होती, बेधडक, बेडर. कदाचित कोणी, म्हणजे उदाहर्णार्थ मीच, जर तिच्या पेरु खाण्याकडे टक लावुन बघत अाहे हे तिला कळल असत तर तिची रिएक्शन काय झाली असती हे माहित नाही. कदाचित तिला मजाच अाली असती. म्हणे मुलग्यांनी मुलींकडे बघितल तर ते त्यांना अावडत. अावडत असेल त्यांना, मला तर अावडतच. कदाचित तिला रागही अाला असता. असतात ना काही खडुस मुली. पण त्यांना कदाचित पोरांचा चांगला एक्सपिरीअंस नसावा. असो.
तशी तिची पाठीवरची बॅग छोटीच. म्हणजे बॅग तिच्या बांध्याच्या वळण्याच्या बाहेर दिसत नव्हती. बॅग अाहे हे फक्त दोन्ही खांध्यावरुन अालेल्या पट्यांमुळेच कळत होत. तशी ती अंगाने फार भरलेली नव्हती. पण राईट मास एट राईट प्लेसेस.म्हणजे हड्डीवर कबाब. डौलदार बांधा. अाणि फिटींगतर छानच. म्हणजे काही ठिकाणी, चवळीच्या शेंगेची उपमा द्यायची ईच्छा होते. असो. पण एकंदर बांधा म्हणजे चांगलाच. बघत राहावा असा. त्यामुळे अापल्याला तिचा ड्रेसिंग सेन्स पण अावडला. जे काही अापण घालतो त्या मध्ये जर अापणच कंफरटेबल नसलो तर कशाला घालावे असे कपडे. अलीकडे मी बऱ्याच मुली बघितल्या ज्यांना फॅशन करायची फार फॅशन. म्हणजे अमुक जण असे कपडे घालत म्हणुन अापण पण घालावे. म्हणजे अापण इन व्होग राहातो. पण जर असे करतांना अापल्या शरीराचा थोडाही भाग दिसायला लागला की तो मात्र लगेच झाकायचा. अाणी त्यातुन जर कोणी अामच्यासारखे त्या थोडया दिसणऱ्या नग्न भागाकडे अॅागल करतांना त्या मुलीने बघितल तर मग झालच. अाता अाम्हीच नालायक अाहे, तर नजर तर तशी राहणारच ना. पण असे करतांना समजा तुम्ही पकडल्या गेलेच तर मात्र, तुमची खैर नाही. ईतक्या रागाने तुमच्याकडे बघतील, की त्या डोळ्यांच्या निखाऱ्यांमुळे तुमच शरीरातल सगळ रक्तच सुकुन जाईल. नाहीतर मग थोडी टी-शर्ट खालीकर, किंवा टॅापचा गळा वर कर, ह्या सगळ्या अॅडजेस्टमेंट सगळा वेळ सुरुच. अशा पोरींना बघितल तर त्या फिड-बॅक लुप्स तर नाही ना, असे वाटत. पण काही पोरी अशा नसतात. म्हणजे अापण जे कपडे घातले अाहे, ते घालुन अापण कसे दिसु, अापले अंगाचा कोणता भाग केवढा एक्सपोज होईल हे त्यांना माहित असत. अाणि या पोरी अामच्यासारख्यांनी त्यांना अॅागल केले तरी कंफरटेबल असतात. त्यांना कदाचित अामच्या सारख्यांची दयाच येत असेल. म्हणजे अशा पोरी एकंदर दयाळुच म्हणायला हव्यात. जर माझ्या शरीराकडे फक्त बघुनच तुम्ही शमणार असाल, तर घ्या खुशाल बघुन.
अापली कंबर एकीकडे थोडीशी वाकवुन ती ऊभी होती. तिची ती पोज बघुन दगडी लेण्यांमध्ये कोरलेल्या अपसरांची अाली. या लेण्या बनवल्या असतील तेव्हापण अशीच, कोणीतरी डौलदार बांध्याची सुंदरी त्या मुर्तीकाराच्या समोर किंवा मनात असावी. मग ती मुर्ती बनवतांना त्या मुर्तीकाराने अापल्या मनातले तिचे प्रतिबिंब दगडात कोरले. अाणि तो किंवा ती सुंदरी तर नाही पण त्याच्या मनातील तिची ती प्रतिमा, तिचे ते प्रतिबिंब मात्र अमर झाले. म्हणजे अाज इतकी शतके होऊन सुद्धा माझ्यासारखे लोक, व माझ्यानंतर येणारे कित्येक लोक ही त्याच्या (का तिच्या) मनातली कलपना पाहु शकतील. पण अापल्याकडे अशी काही कला-बिला नाही. अामचे विचार, प्रतिमा, प्रतिबिंब म्हणजे अापल्यापुरतेच. जर मला माझ्या मनातले सगळच एक्सप्रेस करता अाले असत तर बातच अौर. पण जाऊ द्या. अाम्ही हे असेच.
एकीकडे वाकुन ऊभी राहिल्याने तिचे तसेही डौलदार कर्वज अजुनच ऊठुन दिसत होते. डावा पाय अाडवा तर उजवा सरळ अशी ती ऊभी होती. हलकी हलकी हलत पण होती. कदाचित कुठले गाणे अाठवत असेल. माहित नाही. डाव्या हातात रुमाल होता. जेव्हा उजवा हात पेरुचा घास घेण्यासाठी अोठंाकडे अाणत होती, तेव्हा नजर पेरुवर नाही. कुठेतरी अौरच. जो पेरुचा थोडा रस बोटंाना लागला होता तो मोठ्या चवीने चाटत होती. अामचा सिग्नल सुटला, मान अगदी तिरपी करुन, डोळे अगदी कोपऱ्यात नेऊन तिच्या त्या मोहक रुपाचे प्रतिबींब अापल्या मनात खोल कुठतरी सेव्ह करण्याचा प्रयत्न करत राहिलो. शटर बंद, एक्सपोजर पुर्ण.
No comments:
Post a Comment